सॅनफ्रान्सिस्को : फेसबुकच्या कॉम्युटर नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यात सुमारे पाच कोटी यूजर्सच्या खात्यांमधील माहितीची चोरी झाली असल्याचे कंपनीकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
डेटा चोरीच्या या घटनेचा सुगावा फेसबुकच्या अभियंत्यांना चालू आठवड्याच्या सुरवातीला लागला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हॅकरनी फेसबुकच्याच एका फिचरचा उपयोग करत सुमारे पाच कोटी यूजर्सच्या खात्यांमधील माहितीची चोरी केली. फेसबुकने त्यानंतर पावले उचलत संबंधित त्रूटी दूर केल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
या सायबर हल्ल्याची माहिती सरकारी यंत्रणांना देण्यात आली आहे. या सायबर हल्ल्याचा फटका नेमक्या किती यूजर्सच्या खात्यांना बसला आहे, याचा कंपनी अद्याप शोध घेत आहे. तसेच, हा सायबर हल्ला नेमका कोठून, कोणी आणि कुठल्या उद्देशाने केला, याचा तपास करण्यात येत आहे, असे फेसबुकने म्हटले आहे.
या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी नऊ कोटी फेसबुक यूजर्सना पुन्हा लॉगइन करण्यास भाग पडल्याचे कंपनीने सांगितले. सध्या चौकशीची प्रक्रिया सुरवातीच्या टप्प्यात आहे, असे सांगण्यात आले.

from News Story Feeds https://ift.tt/2Nadfuy
Comments
Post a Comment