जगातील सर्वांत छोटे मेमरी डिव्हाइस तयार

ह्यूस्टन - संशोधक आणि तंत्रज्ञांनी जगातील आतापर्यंतचे सर्वांत छोटे मेमरी डिव्हाइस तयार केले आहे. यामुळे अधिक वेगवान, छोटी आणि कमीत कमी ऊर्जेत प्रभावी काम करणारी इलेक्ट्रॉनिक चिप तयार करण्यास मदत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नवे डिव्हाइस ‘मेमरीस्टॉर्स’ या वर्गात मोडते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या या शोधाची माहिती ‘नेचर नॅनोटेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. शास्त्रज्ञांनी अस्तित्वात असलेल्या सर्वांत छोट्या मेमरी स्टोरेज डिव्हाइसचा आकार आणखी कमी करून तो केवळ एक चौरस नॅनोमीटर इतका करण्यात यश मिळविले. प्रचंड प्रमाणातील मेमरी कमी जागेत स्टोअर करण्याचे तंत्र त्यांनी शोधून काढले.

एक-एक करुन इराणच्या शास्त्रज्ञांना संपवण्यामागे कोणाचा हात? जाणून घ्या

मेमरी स्टोरेज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये असलेल्या अतिसूक्ष्म छिद्रांच्या मदतीने हे करणे शक्य झाल्याचे या संशोधनकार्यातील प्रमुख शास्त्रज्ञ देजी एकीनवँड यांनी सांगितले. ‘या अतिसूक्ष्म छिद्रांमध्ये धातूचा एखादा अतिरिक्त अणू गेल्यास आणि ते छिद्र भरून गेल्यास, त्या अणूतील संवाहकता काही प्रमाणात त्या पदार्थामध्ये जाते.

बापरे, भयानकचं! पोस्टमार्टम सुरु केले, पायही कापला अन् उठला ना मृतदेह रडत 

यामुळे मेमरीच्या परिणामामध्ये बदल होतो,’ असे एकीनवँड म्हणाले. या प्रयोगासाठी नॅनो मटेरिअल म्हणून मॉलिब्डिनम डायसल्फाइडचा प्राथमिक पदार्थ म्हणून वापर केला गेला. मात्र, इतरही अनेक पदार्थांसाठी ही प्रक्रिया वापरता येईल, असा शास्त्रज्ञांना विश्‍वास आहे. 

छोट्या चिपचे फायदे

  • संगणक आणि मोबाईलचा आकार आणखी छोटा होणे शक्य
  • ऊर्जेची मागणी कमी 
  • क्षमता वाढणार

Edited By - Prashant Patil



from News Story Feeds https://ift.tt/3mmDiky

Comments