तुमचा मोबाइल नंबर होणार 11 अंकी; जाणून घ्या कधीपासून नियम लागू होणार

नवी दिल्ली- आजपासून देशभरात कोणत्याही लँडलाइन फोनवरुन मोबाइल नंबरवर फोन करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. नव्या नियमांनुसार आता लँडलाइन फोनवरुन मोबाइल नंबरवर बोलण्यासाठी शून्य (0) लावावा लागणार आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना अधिक नंबर बनवण्याची सुविधा मिळेल. 

याबाबत टेलिकॉम विभागाने 20 नोव्हेंबर रोजी एक निवेदन जारी केले होते. लँडलाइनवरुन मोबाइल नंबर डायल करण्याच्या पद्धतीत ट्रायने (TRAI) सुचवलेल्या शिफारशी मान्य करण्यात आल्या असल्याचे या निवेदनात म्हटले होते. ही सुविधा आता आपल्या क्षेत्रातून बाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे. 

हेही वाचा- धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, किरीट सोमय्यांची मागणी

शून्यपासून तयार होतील 254.4 कोटी नंबर
डायल करण्याच्या पद्धतीतील बदलामुळे दूरसंचार कंपन्यांच्या मोबाइल सेवांसाठी 254.4 कोटी अतिरिक्त नंबर तयार करण्याची सुविधा मिळेल. हे भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करतील. त्याच्या पुढे जाऊन नवीन नंबरही कंपन्या जारी करु शकतील. 

11 अंकांचा असू शकतो मोबाइल नंबर
भविष्यात टेलिकॉम कंपन्या 11 अंकी मोबाइल नंबर जारी करु शकतात. सध्या देशात मोबाइल ग्राहकांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे 10 अंकांचा मोबाइल नंबरही कमी पडत आहे. अशावेळी केवळ 0 च्या प्रयोगामुळे पुढील मार्ग सोपा होईल. 

हेही वाचा- इच्छाधारी नागिननं घेतली एक कोटीची गाडी ; व्हिडिओ केला शेअर

याबाबत टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना गुरुवारी याची आठवण करुन दिली. ग्राहकांना आता आजपासून (दि.15) लँडलाइनवरुन मोबाइलवर कॉल करताना आधी शून्य डायल करावा लागेल. एअरटेलने आपल्या फिक्स्ड लाइन ग्राहकांना सांगितले की, 15 जानेवारी 2021 पासून अंमलात येत असलेल्या दूरसंचार विभागाच्या एक निर्देशानुसार तुम्हाला तुमच्या लँडलाइनवरुन कोणत्याही मोबाइलवर फोन लावताना आधी शून्य डायल करावा लागेल. दरम्यान, सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचे अध्यक्ष पीके पुरवर यांनी याबाबत ग्राहकांना याची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. 
 



from News Story Feeds https://ift.tt/3oMbTKc

Comments