नवी दिल्ली - विविध हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तसेच कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मिरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात भारतात तब्बल ८,९२७ तास इंटरनेट सेवा बंद केल्याने देशाला २.८० अब्ज डॉलरचा आर्थिक फटका बसल्याचे ब्रिटनमधील डिजिटल प्रायव्हसी आणि सिक्युरिटी रिसर्च संस्थेच्या अहवालातून समोर आले आहे. इंटरनेट बंदीमुळे सर्वाधिक आर्थिक नुकसान झालेल्या दक्षिण आशियाई २१ देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे.
जगभरात होणारी विविध आंदोलने, मानवी हक्कांसंदर्भातील निदर्शने, निवडणुकीतील गदारोळ, माध्यमांचे स्वातंत्र्य आदींसह अन्य कारणांमुळे जगभरात २०२० मध्ये तब्बल २७,१६५ तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्याचा फटका सुमारे २६ कोटी लोकांना बसला. २०१९ च्या तुलनेत हे इंटरनेट सेवा बंद करण्याचे प्रमाण तब्बल ४२ टक्क्यांनी वाढले. जागतिक बॅंक, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आणि दिल्लीतील सॉफ्टवेअर फ्रीडम लॉ सेंटरने दिलेल्या माहितीवरून इंटरनेट सेवा बंद केल्याचे परिणाम समोर आले आहेत. जम्मू-काश्मिरातील कलम ३७० हटवल्यानंतर जवळपास सात महिने इंटरनेट सेवा बंद होती. त्याचा परिणाण तेथील आरोग्य व्यवस्था, उद्योगधंदे तसेच शाळांवरही झाल्याचे या अहवालातून दिसून आले आले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
भारतानंतर इंटरनेट सेवाबंदीचा सर्वाधिक फटका बेलारूसला बसला. तेथे गेल्या वर्षभरात २१८ तास इंटरनेट बंदी असल्याने ३३.३ कोटी डॉलरचे नुकसान झाले. राष्ट्राध्यक्ष पदाच्या वादग्रस्त निवडणुकीवेळी बेलारूसमध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. येमेनमध्येही वर्षभरात ९१२ तास इंटरनेट सेवा बंद असल्याने २३.८० कोटी डॉलरचे; तर म्यानमारमध्ये वर्षभरात ५१६० तास इंटरनेट बंद असल्याने १८.९० कोटी डॉलरचे नुकसान झाले.
WhatsApp नव्या वर्षात आणतंय जबरदस्त फिचर्स; जाणून घ्या डिटेल्स
चीन, उत्तर कोरियाची माहिती नाही
चीन, उत्तर कोरियासारख्या देशांमध्ये इंटरनेटच्या वापरावर मर्यादा असल्याने या देशांचा समावेश या अहवालात केला नसल्याचे सांगण्यात आले. या देशांमधील बरीच माहिती इंटरनेट वा समाज माध्यमांवरही उपलब्ध नसल्याने त्यांचा या अहवालात समावेश नाही.
Edited By - Prashant Patil
from News Story Feeds https://ift.tt/3bdCcVu
Comments
Post a Comment