फोनच्या गॅलरीमध्ये सीक्रेट ठिकाणी ठेवा फोटो आणि व्हिडिओ. जाणून घ्या याची सोपी पद्धत

कोल्हापूर: स्मार्टफोन मध्ये आज अनेक सुविधा आल्या आहेत. सोशल मीडिया आणि इन्स्टंट मेसेज ॲप या माध्यमातून वापरकर्ते  अनेक फाईल एकमेकांना पाठवत असतात. परंतु यातील काही फोटोज किंवा व्हिडिओ असे असतात की आपणास ते सुरक्षित ठिकाणी कोणालाही न दिसतील अशा ठिकाणी ठेवावे असे वाटते. जर तुम्ही आय ओ एस अँड्रॉइड युजर असाल तर आम्ही तुम्हाला एक खास टीप्स देणार आहोत. ज्या माध्यमातून तुम्ही फोटो आणि व्हिडिओ  सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता. जाणून घेऊया ही  पद्धत काय आहे आहे.

 आय ओ एस मध्ये असे तयार करा सिक्रेट फोल्डर

 ॲपल ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक खास सुविधा दिली आहे. ज्या मध्ये मुख्य अल्बम आणि गॅलरी मधील फोटो आणि व्हिडिओ आपण हाईड करू शकतो. 

यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

तुमच्या आयफोन मधील अथवा आयपॅड मधील फोटो ॲप सुरू करा 

-जे अल्बम तुम्ही पाहणार आहात त्याला टॅप करा
 
- वरच्या  डाव्या बाजूला दिलेल्या सिलेक्ट ऑप्शन ला टॅप करा.

- जे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही हाईड करणार आहात ते निवडा.

- शेअर बटण टॅप करा 

-शेअर शीट मेनू मधील हाईड सिलेक्ट करा

-  तुमचे फोटो आणि व्हिडिओ हाईड  करणार म्हणून कन्फर्म करा 

हिडन केलेले फोटो आणि व्हिडिओ पुन्हा दिसण्यासाठी स्क्रोल करून Other Album मध्ये जावा. या ठिकाणी हीडन वर टॅप करा. जे फोटो आणि व्हिडिओ हाईड केला आहात ते याठिकाणी पुन्हा सेव्ह होतात. फोटोज अन हाईड करण्यासाठी शेअर बटन वर टाईप करून  हाईड सिलेक्ट करा.

अँड्रॉइड मोबाईल वर असे तयार करा हिडन फोल्डर.. 

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या मोबाईल मध्ये या सुविधेसाठी वेगवेगळ्या कृती दिल्या आहेत.या ठिकाणी आम्ही तुम्हाला फोटो दडवून ठेवण्यासाठी सर्वसाधारण पद्धत सांगणार आहोत जे जास्तीत जास्त अँड्रॉइड डिवाइस मधील गुगल फोटोज ॲप मध्ये काम करतात. तुमच्या स्टॉक अँड्रॉइड मधील स्मार्टफोनमध्ये अशा पद्धतीने फोटो तुम्ही दडवून ठेवू शकता. 
- स्मार्ट फोनमधील गुगल फोटोज ॲप ओपन करा.
- जे फोटो तुम्हाला दडवून ठेवायचे आहेत ते सिलेक्ट करा
- डाव्या बाजूस असलेल्या तीन डॉट वर टॅप करा -ड्रॉप-डाऊन मेन्यू मधील Move to Archive ऑप्शन वर टॅप करा.
अशा पद्धतीने तुमचे फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्या नावाने दुसऱ्या फोल्डरमध्ये ठेवू शकता हे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही गुगल फोटोज मध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकता हे फोल्डर दुसऱ्या कोणास  दिसणार नाही अशी सुविधा यामध्ये आहे.



from Sci-tech Feeds https://ift.tt/3kueKWN

Comments