पुणे - अनेकदा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचे आयएमईआय नंबरची आवश्यकता भासते. तुम्ही तुमचा जुना फोन विकत आहात किंवा नवीन फोन खरेदीसाठी एक्स्चेंज करत असाल.
आयएमईआय नंबर म्हणजे काय?
डिव्हाईसच्या प्रोडक्शनच्या दरम्यान उत्पादक प्रत्येक डिव्हाईसला एक युनिक नंबर देतो. त्यास आयएमईआय नंबर असे म्हटले जाते. आयएमईआयचा अर्थ इंटरनॅशनल मोबाईल स्टेशन इक्वेपमेंट आयडेंटिटी आहे. फोन हरवला किंवा चोरी झाल्यास ते ट्रॅक करणे व नेटवर्क ब्लाॅक करण्यासाठी हा पत्ता खूप आवश्यक असतो. आयएमईआय नंबरला ब्लॅक लिस्ट करणे किंवा पुन्हा लोकल नेटवर्कला फोनशी प्रतिबंधित करण्यासाठी पोलिसही आयएमईआय नंबरची मदत घेतात.
अँड्राॅईड, फीचर फोन आणि ॲपल आयफोनवर आयएमईआय नंबर असे चेक करा
सॅमसंग, मी, रिअल्मी, ओप्पो, व्हिओ, वनप्लस आणि ॲपल सारखे ब्रँड्सचे फोनला आयएमईआय नंबर शोधण्याचा सर्वांत सोपी पद्धती USSD कोड्स आहे. ही पद्धत सर्वांत चांगली असून ती साधारणपणे सर्व मोबाईल फोन्सवर काम करते. युएसएसडी कोडचा वापर करुन जाणून घ्या आयएमईआय नंबर...
- सर्वप्रथम आपल्या फोनच्या डायल ॲपवर जा.
- आता तुम्हाला फोनमधून *#06# डायल करावे लागेल.
- जसे तुम्ही हॅश बटन दाबल्यास, तुमच्या स्क्रीनवर आयएमईआय नंबर दिसायला लागेल.
- या नंतर तुम्ही नंबर नोट करा किंवा स्क्रिनशाॅट घेऊन ते आपल्या गुगल ड्रायव्हमध्ये सेव्ह करा.
दुसरी पद्धत - iPhone वर आयएमईआय नंबर जाणून घेण्याची पद्धत
आयफोन युजर्ससाठी आयएमईआय नंबर शोधणे खूप सोपे होते. iPhone 5 सीरिजपर्यंत अॅपल हँडसेटचे रिअर पॅनलवर आयएमईआय अँग्रेव्ह (खोदणे) करत होती. मात्र iPhone 6 सीरिज लाँच होण्याबरोबरच या कंपनीने फोन्सच्या रियर पॅनलवर आयएमईआय नंबर अँग्रेव्हिंग बंद करुन टाकली. यापूर्वी iPhone 4sचे सीम ट्रेवर आयएमईआय नंबर प्रिंट होत होते. मात्र नव्या आयफोन युजर्स आपल्या फोनचा आयएमईआय नंबर जाणून घेण्यासाठी हे स्टेप्स वापरा..
- सर्वांत प्रथम सेटिंग ॲपमध्ये जा.
- लिस्टमधून जनरल सिलेक्ट करा आणि अबाऊटवर टॅप करा
- अबाऊट सेक्शनमध्ये तुम्हाला आयएमईआय नंबर आणि बाकी इतर आवश्यक तपशील मिळून जातील.
अँड्राॅईड डिव्हाईसवर आयएमईआय नंबर चेक करण्याची दुसरी पद्धत
जर तुम्ही युएसएसडी कोडचा प्रकार विसरुन गेलात तर तुम्ही तुमच्या अँडाॅईड स्मार्टफोनवर आयएमईआय नंबर शोधण्यासाठी या साध्या सोप्या पद्धतीचा अवलंब करु शकतो.
- सर्वप्रथम सेटिंगअॅपमध्ये जा
- आता Status ऑप्शनसाठी स्क्रोल डाऊन करा
- Status ऑप्शन सिलेक्ट करा आणि आता तुम्हाला डिस्प्लेवर आयएमईआय नंबर दिसत असेल.
फीचर फोन युजर्स युएसएसडी कोडचा वापर करुन आयएमईआय नंबर चेक करु शकतात. किंवा बॅटरी काढून ते पाहता येऊ शकते. कारण कंपनी फोनच्या आत स्टिकरवर आयएमईआय नंबर प्रिंट करते. आयएमईआय नंबर चेक करण्यासाठी मोबाईल उघडून बॅटरी बाहेर काढा. काळजीपूर्वक पाहिल्यास आयएमईआय नंबर रिटेल बाॅक्स आणि बिलवरही लिहिलेला असतो.
from Sci-tech Feeds https://ift.tt/2Oaw2w8
Comments
Post a Comment