मोबाईल मधून तुमचे नंबर डिलीट झाले तर गुगलच्या मदतीने असे मिळवा पुन्हा नंबर

कोल्हापूर : मोबाईल ही आता एक गरजेची वस्तू बनली आहे या मोबाईल मध्ये आपले सर्व महत्वाचे नंबर असतात जेव्हा आपला मोबाईल हरवतो त्यावेळी सर्वात आपल्यास टेन्शन येते आपल्याजवळ नसलेल्या नंबरची परंतु हे सर्व नंबर गुगल ड्राईव्ह बॅकअप वर असतील तर तुम्हाला कोणतेही टेन्शन घेण्याची गरज नाही.

स्मार्टफोन मध्ये आपण शेकडो नंबर ठेवलेला असतात. परंतु हे नंबर डिलीट झाले तर आपणास होणारे दुःख सांगता येत नाही. फोन हरवला तर जवळच्या मित्रांचे आपल्या परिवारातील अधिक सदस्यांचे नंबर आपल्याजवळ नाहीसे होतात. हे सर्व नंबर पुन्हा मोबाईल मध्ये घेण्यासाठी आपला खूप वेळ जात असतो. मात्र गुगल च्या मदतीने आपण हे नंबर पुन्हा रिस्टोअर करू शकतो. तुम्ही जर आपले सर्व फोन गुगल ड्राईव्ह बॅकअप घेतला नसाल तर ते नेहमी घेऊन ठेवावे.

मोबाईल मध्ये सिम कार्ड आणि मोबाईलच्या स्टोअर मध्ये आपले नंबर असतात. हे सर्व नंबर आपण गुगल वरती ठेवू शकतो. जेव्हा आपला फोन खराब होतो किंवा हरवतो अन्यथा अनेक वेळा आपण नवीन फोन घेतो त्यावेळी आपण सहजपणे हे सर्व नंबर दुसऱ्या मोबाईल मध्ये रिस्टोर करू शकतो. त्याचबरोबर एका अँड्रॉइड मोबाईल मधून दुसऱ्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये आपण हे नंबर रिस्टोअर करू शकतो. त्यामुळे तुमचे महत्त्वाचे नंबर डिलीट झाले तरी तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही गुगल वर नंबर स्टोअर आणि रिस्टोअर करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.

एक्सपोर्ट करा कॉन्टॅक्ट नंबर
-तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन किंवा टॅबलेटच्या कॉन्टॅक्ट ॲप वरती जावा.
- या ठिकाणी वरच्या बाजूस उजव्या साईडला मेनू वर टॅप करा आणि सेटिंग मध्ये जावा.
- त्यानंतर तुम्हाला एक्स्पोर्ट हा ऑप्शन येतो 
-तुम्ही तुमच्या अकाउंट वरील सर्व कॉन्टॅक्ट नंबर याठिकाणी बॅकअप वर घेऊ शकता.
- त्यानंतर Export to.VCF वर टॅप करा आणि कॉन्टॅक्ट सर्व नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पुन्हा स्टोअर होऊन जातील.

ऑटोमॅटिक बॅकअप सुरू ठेवा..
 जेव्हा तुम्ही तुमचा नवा स्मार्टफोन वर गुगल अकाऊंट सेटअप करता तेव्हा गुगल तुम्हाला फोनवरील डेटा गुगल ड्राइव्ह मधुन घेणारा का असे विचारते. या ठिकाणी तुम्हाला टॉगल ऑन ठेवणे गरजेचे आहे. याच बरोबर तुमच्या फोनच्या सेटिंग मधूनही हा सेट अप तुम्ही बदलू शकता.
- तुमच्या अँड्रॉइड मोबाईल चे सेटिंग ओपन करा -त्यानंतर सिस्टीम मध्ये जाऊन बॅकअप वर टॅप करा
 - याठिकाणी बॅकअप टू गुगल ड्राईव्ह या ठिकाणचे टॉगल ऑन करा.

कॉन्टॅक्ट नंबर असे बॅकअप मधून रिस्टोअर करा
- तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये जावा.
- त्यानंतर गुगल वर टॅप करा 
 -या ठिकाणी सर्विस या विभागांमध्ये रिस्टोअर कॉन्टॅक्ट हे ऑप्शन दिसेल.
- जर तुमचे अकाऊंट मोबाईल मध्ये लॉगिन करून ठेवला असेल तर तो डिव्हाईस तुम्हाला कोणत्या अकाउंट मधून रिस्टोअर करणे आहे असे विचारेल. -त्यानंतर अकाउंट मधील सर्व जुने नंबर वर टॅप करा.जे तुम्हाला हवे आहेत.
- या ठिकाणी तुम्हाला सिम कार्ड किंवा डिवाइस स्टोरेज हा ऑप्शन दिसेल. 
-त्यानंतर रिस्टोअर वर टॅप करा. थोड्यावेळात कॉन्टॅक्ट रिस्टोअर असे दिसेल.
- या ठिकाणी तुमचे यापूर्वीच फोनमध्ये नंबर असतील तर ते दुसऱ्यांदा रिस्टोअर होणार नाहीत.



from Sci-tech Feeds https://ift.tt/2OceEXW

Comments