आपल्या डेटावर हॅकर्सची असते नजर; या सात मार्गाने ठेवा तुमचा डेटा सेफ 

नवी दिल्ली - इंटरनेट आज आपल्या दैनंदिन जीवनातला महत्त्वाचा घटक बनला आहे. याबरोबरच आता आपली प्रायव्हसीही धोक्यात आली आहे. दररोज याबाबत घटनासमोर येत असतात, ज्यात युजर्सचा डेटा हॅक केला जातो. ही गंभीर बाब आहे. जर युजर्सचा डेटा हॅकर्सच्या हातात लागले तर तो त्याच्या माध्यमातून युजर्सला मोठी किंमत मोजावी लागू शकते. यात बँक खात्यामधून पैशाची चोरीबरोबरच सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्याचाही धोक असतो. युजर हॅकिंग प्रामुख्याने सोशल इंजिनिअरिंगचा भाग आहे. एक हॅकर या फ्राॅडस्टर युजरला जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरतो. युजर हॅकिंगचा शिकार होऊ नये यासाठी Wi-Jungle चे सीईओ आणि सहसंस्थापक कर्मेश गुप्ता यांनी काही खास ट्रिक्स सांगितल्या आहेत. तर जाणून घेऊ या त्याविषयी...  

कोणालाही ओटीपीचा पासवर्ड सांगू नका

कर्मेश गुप्ता सांगतात, की ही फार क्षुल्लक गोष्ट वाटत असेल. अनेकदा बँकेतून आलेले मॅसेज किंवा ईमेलमध्ये तुम्ही जरुर वाचले असेल, तरीही पूर्ण सावधपणे पालन करणे आवश्यक आहे. कोणत्याही बँक किंवा कोणत्याही कंपनीकडून आलेल्या काॅलवर  जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोपनीय माहिती ( जसे की बँक क्रेडिट/डेबिट कार्डचे तपशील, ओटीपी, युपीआय आयडी/पिन, ऑनलाईन पासवर्ड वा इतर माहिती) विचारल्यास सांग नका. हॅकर्स याच माध्यमातून लोकांना लक्ष्य करतात. 

पासर्वड स्ट्राँग ठेवा

तुमच्या कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफाॅर्म्सचे पासवर्ड स्ट्राँग ठेवा. त्यात स्पेशल कॅरेक्टर जसे की $ @#!%&, नंबर, छोटे आणि मोठे कॅरेक्टरचा अवलंब करावा आणि कमीत-कमी 10 कॅरेक्टरचे पासवर्ड जरुर ठेवा. ट्रू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन अनिवार्य स्वरुपात चालू करुन ठेवा. सर्व प्लॅटफाॅर्म्सवर पासवर्ड वेगळे ठेवा आणि ती मोबाईलमध्ये, लॅपटाॅप किंवा क्लाऊडवर एकाच फाईलमध्ये सेव्ह करुन ठेवू नका. 

व्हेरिफिकेशन आवश्यक 

तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ईमेल आल्यास ते ट्रू ॲड्रेस अवश्य व्हेरिफाय करा. जर ईमेल विशेषतः सोशल मीडिया वेबसाईटचा असेल आणि पासवर्ड रिसेट करायला सांगत असेल. किंवा आणखी काही गोपनीय माहिती मागत असेल तर ईमेलचा डोमेन @facebook.com वा @twitter.com तर नाहीना. जर असे असेल तर त्यास लगेच स्पॅम रिपोर्ट करा. ईमेल चेक केल्यानंतर त्यास व्हॅलिड दिसल्यावरच अटॅचमेंट डाऊनलोड करा. बिना ईमेल व्हेरिफाय केलेल्या ॲटॅचमेंट उघडल्यास सिस्टिममध्ये मालवेअर येऊ शकतो. या नंतर हॅकर सिस्टिममध्ये स्टोर डेटा प्राप्त करु शकतो आणि त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. 

युआरएल जरुर चेक करा

सोशल मीडिया मॅसेजिंग प्लॅटफाॅर्म्सवरुन येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या डिल्स, ऑफर्स, डिस्काऊंट्स किंवा स्किम्स ओपन करण्यापूर्वी त्याचे युआरएल चेक करा. उदाहरणार्थ जर पेटीमवर कोणतेही ऑफर सांगितले असेल तर प्रथम हे पाहा कि वेबसाईट युआरएल काय आहे. जर युआरएल पेटीएमडाॅटकाॅम असेल तर ओपन करा अन्यता करु नका आणि शाॅपिंगही करु नका. 

इनकाॅग्निटो विंडोचा वापर करा

कोणत्याही दुसऱ्या मोबाईल किंवा लॅपटाॅपचा वापर करायच्या वेळी इनकाॅग्निटो विंडोत इंटरनेटशी संबंधित कामे करा. कामे पूर्ण झाल्यावर लाॅगआऊट करा. या व्यतिरिक्त विंडो बंद करायला विसरु नका. तुमच्या लॅपटाॅपमध्ये ही बँकिंग किंवा शाॅपिंग आदींशी निगडित वेबसाईट्सही इनकोग्निटो विंडोमध्ये ओपन करा. कोणत्याही वित्तीय किंवा त्याच्याशी संबंधित वेबसाईटचा पासवर्ड ब्राऊझरमध्ये सेव्ह करु नये. या प्रकारे कोणत्याही असुरक्षित पब्लिक नेटवर्कवर इंटरनेट करुन पैशाचा व्यवहार करण्याचा प्रयत्न शक्यतो टाळा. 

चॅटवर कोणालाही पासवर्ड देऊ नका

तुमच्या घरचा सदस्या असो किंवा परिचित व्यक्तीला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डशी संबंधित इतर गोपनीय माहिती मागितल्यास संबंधितास व्हाॅट्सॲप किंवा कोणत्याही मॅसेजिंग ॲप , टेक्स्ट मॅसेज आणि काॅल आदीवर तपशील पाठवू नका. स्वतः माहिती तुकड्या तुकड्यात वेगवेगळ्या प्लॅटफाॅर्म्सवर शेअर करा. उदाहरणार्थ डेबिट कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, सीव्हीव्ही, नाव आदी एकाच वेळेस व्हाॅट्सॲप करु नका किंवा कार्डचा फोटो काढून ते शेअर करु नये. असे या साठी की जर तुम्ही किंवा ज्याला माहिती दिली आहे. त्या व्यक्तिचा एक्सेस कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिला मिळाल्यास त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. दुसरे चॅटचे बॅकअप फाईल ज्या लोकेशनवर स्टोर होते, त्या लोकेशनवर डिरेक्टरी किंवा फोल्डर इतर ॲपसह शेअर होते आणि ते वाचले जाऊ शकते. तिसरी गोष्ट, जर एखाद्या पाॅईंटवर ते हॅक झाल्यास तुमचा कोणताही डाटा हॅकर्सच्या हाती लागणार ज्यामुळे तुमचे नुकसान होईल. 

प्सला कमीत-कमी परमिशन द्या

शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, ॲप्स डाऊनलोड करताना कमीत-कमी परमिशन द्या. कारण बरेच ॲप्स तुमच्याकडून परमिटेड डाटा आपल्या सर्व्हर नियमितपणे स्टोर करतात. या ॲप्सचा कोणताही डाटा चोरीला जाऊ शकते. यामुळे तुमची माहिती सार्वजनिक होऊ शकते. किंवा हॅकर्स त्याचा चुकीच्या उद्देशासाठी वापर करु शकतो. नंतर कधी तुम्हाला कोणत्याही ॲप ची आवश्यकता भासल्यास आवश्यक ते परमिशन इनेबल करा. तेही व्हाईल युजिंग दी ॲप ऑप्शन बरोबर.



from Sci-tech Feeds https://ift.tt/2ZZ190b

Comments