चिंता नको! गुगल घेऊन आलाय Google One; तुमची सुटेल स्टोरेजची चिंता

नागपूर : आपण सर्वजण गुगलचा वापर करतो. म्हणायचं झाल तर या शिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. मात्र, यामध्ये महत्त्वाचे मेरेज जमा (स्टोरेज) करण्याची जागा फार कमी आहे. आजच्या युगात फोटो सुद्धा ४०० ते ५०० पीक्सलच्या वर राहत असल्यामुळे त्याची साठवणूक करून ठेवण्यास मोठी अडचण जाते. यामुळे काय करावे आणि काय नाही असा प्रश्न वापरकर्त्याला पडतो. आता चिंता नको. कारण, गुगल तुमच्यासाठी घेऊन आला आहे Google One सेवा.

ऑफिशीयल काम करणाऱ्या लोकांना जीमेलचे खाते लवकर भरत असतात. अनावश्यक मेल डिलीट केले तरी त्यांना जागा काही कामी येत नाही. त्यामुळे ते नेहमी ओरडत असतात. याला गुगल ड्राईव्ह एक चांगला पर्याय आहे. मात्र, याद्वारे त्यांना कोणतीही मोठी फाईल पाठविण्यास मोठी अडचण जाते. अशा वापरकर्त्यांसाठी गुगल एक हा चांगला पर्याय ठरू शकतो. फक्त वापरकर्त्याला यासाठी काही रक्कम मोजावी लागेल.

अधिक वाचा - पोलिसांना जंगलात दिसले भांडे, भाजीपाला, राशन; आत शिरताच बसला मोठा धक्का

गुगलची गुगल एक सेवा वापरकर्त्यांना ऑनलाइन स्टोरेजची सेवा उपलब्ध करून देते. यामुळे तुमची कोणतीही गोष्ट साठवून ठेवण्याची समस्‍या कायमची सुटून जाईल. मात्र, यासाठी वापरकर्त्याला विशिष्ट रक्कम मोजावी लागेल. ही रक्कम भरताच तुम्ही ऑनलाइन उच्च रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ संचयित करू ठेऊ शकता. विशेष म्हणजे ही सेवा बऱ्यापैकी सुरक्षित आहे. यात संग्रहित करून ठेवलेला तुमचा डेटा कुणीही चोरू शकणार नाही.

गुगलची गुगल एक पेड मेंबरशीप प्लॅन आहे. याचा वापर तुम्ही स्टोरेज वाढवण्यासाठी आणि फोन बॅकअपसाठी करू शकता. त्याशिवाय, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गुगल एक्सपर्ट्स आणि फॅमिली शेअरिंगचा एक्सेस देखील मिळतो. नुकतीच गुगलने विपिन सुविधा सुरू केली आहे. त्याशिवाय, कंपनीने प्रो सेशनची सुरुवातही केली आहे. या माध्यमातून मेंबर्स गुगल एक्सपर्टसोबत वन-टू-वन संपर्क साधू शकतात, असंही कंपनीने स्पष्ट केलं. चला तर जाणून घेऊया Google One काय आहे आणि याचा वापर कसा करता येईल.

क्लाऊड स्टोरेज सेवा

गुगल एक ही गुगलची क्लाऊड स्टोरेज सर्व्हिस आहे. जिथे लोक अधिक मेमरी तसेच इतर वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकतात. आपण एक ठरावीक रक्कम भरून गुगलची ही सेवा वापरू शकता. यात तुम्ही फोटो-व्हिडिओ, संपर्क, संदेश आणि डिव्हाइस डेटा संचयित करू शकता. आतापर्यंत तुम्ही गुगल ड्राइव्हच्या विनामूल्य सेवेचा लाभ घेतला आहे. ज्यामध्ये आपल्याला मर्यादित जागा मिळते. मात्र, एक जूनपासून तुम्हाला गुगल एकचा आनंद घेत येणार आहे.

अधिक माहितीसाठी - काय सांगता, संजय राठोड यांची कॉँगेस उपाध्यक्षपदी वर्णी

असा करा गुगल एकचा वापर

गुगल एकला गूगलने २०१८ मध्ये आणले होते. आता ही सेवा हळुहळू गुगल ड्राईव्हची जागा घेत आहे. आजच्याघडीला डेटाच सर्वकाही झाले आहे. त्यामुळे अधिक जागेसह सुरक्षेची हमी गरजेची झाली आहे. गूगल एकमध्ये सदस्यता घेतल्यास आपल्याया अधिक जागा मिळते. याचा वापर तुम्ही फोन, लॅपटॉप आणि संगणकावर करू शकता.

योजना आणि किंमत

गुगलचा वापर करण्यासाठी तुम्हाला मासिक किंवा वार्षिक शुल्क भरावे लागेल. उदाहरण सांगायचं झाले तर गुगल एक वर शंभर जीबी स्टोरेज विकत घेत असाल तर तुम्हाला दरमहा १३० रुपये मोजावे लागतील. तसेच एक वर्षांचा वापर करण्यासाठी १,३०० रुपये मोजावे लागेल.



from Sci-tech Feeds https://ift.tt/3dTzkys

Comments