इंस्टाग्राम घेऊन आलाय Recently Deleted फीचर; डिलिट केलेले फोटो, व्हिडिओ मिळेल परत

नागपूर : इंस्टाग्राम आज प्रत्येकजण वापरत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप पेक्षा हा वेगळा आणि चांगला पर्याय आहे. यामुळे याचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. येथे फोटो अपलोड करताना त्यात अधिकच ॲडीशन करता येते. यामुळे इंस्टाग्राम सर्वांच्या पसंतीत उतरत आहे. येथे कोणतीही पोस्ट किंवा व्हिडिओ चुकून डिलिच झाला तर तुम्ही ते परत मिळवू शकतात.

अनेक ॲपवर फोटो किंवा व्हिडिओ चुकून डिलिट झाल्यास मोठा मनस्ताप होतो. यामुळे अनेकजण आपले फोटो आणि व्हिडिओ अनेक ठिकाणी संग्रहित करून ठेवतात. काही वेळा असे करण्याचे राहून जाते. नेमकं याच वेळेस फोटो किंवा व्हिडिओ डिलिट झाल्यास चीड आल्याशिवाय राहत नाही. मात्र, यावर इंस्टाग्रामने पर्याय शोधून काढला आहे. याचा वापर करून तुम्ही तुमचे डिलिट झालेले फोटो किंवा व्हिडिओ परत मिळवू शकता. चला तर जाणून घेऊया ते कसे...

इंस्टाग्रामने अलीकडेच एका नवीन फीटरची घोषणा केली आहे. या फीचरला Recently Deleted असे नाव दिले आहे. हे फीचर वापरकर्त्यांना अलीकडे हटविलेले पोस्ट आणि व्हिडिओ पुनर्प्राप्त करण्यात मदत करणार आहे. हे फीचर विशेषतः जुन्या पोस्टसाठी तयार केले गेले आहे. जे ॲपवरून हटविले गेले आहेत. हे फीचर वापरू इच्छिणाऱ्यांना काही खालील प्रकारचा वापर करावा लागणार आहे. 

इंस्टाग्रामने अधिकृत पृष्ठाद्वारे हे उघड केले आहे. वापरकर्त्याच्या खात्याचे अधिक संरक्षण करण्यासाठी कंपनीने अनेक सुरक्षा मानके जोडली आहेत. कधी कधी हॅकर्सद्वारा कोणाचेही खात हॅक करून माहिती डिलीट केली जाते. आतापर्यंत लोकांकडे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सहजपणे पुनर्प्राप्त करण्याचा कोणताही मार्ग नव्हता. अशा परिस्थितीत कायमस्वरूपी हटविलेली सामग्री परत मिळवता येत नव्हती. मात्र, इंस्टाग्रामने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

असे वापरा Instagram Recently Deleted

तुमच्या खात्यातून कोणताही व्हिडिओ हटविला गेला असेल तर प्रथम आपल्याला खात्याच्या सेटिंग्जवर जावे लागेल. येथे खात्यावर टॅप करावे लागेल आणि अलीकडे हटवलेल्या पर्यायावर टॅप करावे लागेल. येथे आपण हटविलेले सर्व फोटो किंवा पोस्ट पाहू शकता. आपण या वर टॅप करा आणि पुनर्संचयित पर्याय वर टॅप करा. यानंतर तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ परत मिळेल. परंतु, लक्षात ठेवा की केवळ ३० दिवसांच्या आत हटविलेली सामग्री मिळवता येईल.

सत्यापन प्रक्रियेबद्दल जाणून घ्या

आपली पोस्ट किंवा व्हिडिओ पुनर्प्राप्त करण्यासाठी आपल्याला सत्यापन प्रक्रियेद्वारे जावे लागेल. या प्रक्रियेत आपल्याला आपला ईमेल आयडी प्रदान करावा लागेल. या प्रक्रियेद्वारे आपले खाते हॅकर्स किंवा इतर कोणत्याही प्रवेशापासून सुरक्षित असेल.



from Sci-tech Feeds https://ift.tt/3r6Atqd

Comments