Video: मोदींचा फोटो असलेल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; 2021 मधील पहिले मिशन

नवी दिल्ली- इस्त्रोने यावर्षीचे पहिले मिशन यशस्वीपणे पार पाडले आहे. भारताच्या रॉकेटने आज रविवारी श्रीहरिकोटा अवकाश केंद्रातून पहिल्यांदा ब्राझीलचा उपग्रह घेऊन उड्डान केले. इस्त्रोच्या पीएसएलवी-सी 51ने ब्राझीलच्या अमेडोनिया-1 आणि इतर 18 उपग्रहांना घेऊन श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून सकाळी १० वाजून २४ मिनीटांनी हे प्रक्षेपण नियोजित होते.

ब्राझीलच्या ॲमेझोनिया-१ या उपग्रहाला घेऊन ‘पीएसएलव्ही सी-५१’ अवकाशात गेले.. त्याशिवाय इतर १८ उपग्रहांनाही अवकाशातील त्यांच्या नियोजित कक्षेत सोडले जाणार आहे. या मोहिमेद्वारे एकूण २० उपग्रह सोडले जातील, असे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ‘पिक्सल’ या भारतातील स्टार्ट अप कंपनीने सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे त्यांच्या ‘आनंद’ या उपग्रहाचे प्रक्षेपण रद्द केले. यानंतर आयएनएस-२ डीटी हा आपला नॅनो उपग्रहही या मोहिमेत सहभागी होणार नसल्याचे ‘इस्रो’ने जाहीर केले होते. या उपग्रहात काही तांत्रिक त्रुटी राहिल्याने हा निर्णय घेतल्याचे ‘इस्रो’चा व्यावसायिक विभाग असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडचे (एनएसआयएल) अध्यक्ष जी. नारायणन यांनी सांगितले.  ‘एनएसआयएल’साठी ‘पीएसएलव्ही सी-५१’ची ही पहिलीच संपूर्ण व्यावसायिक मोहिम आहे. अमेरिकेतील ‘सियाटल’ आणि ‘स्पेसफ्लाइट’ या कंपन्यांच्या सहकार्याने ती राबविली जाणार आहे.

उपग्रहांची माहिती 

ॲमेझोनिया-१ (ब्राझील) : ६३७ किलो वजन, ऑप्टीकल अर्थ ऑब्झर्वेशन इन स्पेस संस्थेतर्फे चार उपग्रह (यापैकी तीन भारतीय शैक्षणिक संस्थांचे तीन ‘युनिटी सॅट’ आणि स्पेस किड्‌झ इंडियातर्फे एक ‘सतीश धवन सॅट’)

उपग्रहाच्या वरच्या भागावर मोदींचा फोटो

उपग्रहाच्या वरच्या भागावर पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आला होता. आत्मनिर्भर भारताची सुरुवात आणि अवकाश क्षेत्रातील खासजीकरणातील एकजूटतेप्रती आभार व्यक्त करण्यासाठी मोदींचा फोटो वापरण्यात आल्याचं एसकेआयने सांगितलं. शिवाय उपग्रहासोबत भगवत गीताही पाठवण्यात आली आहे.

 



from Sci-tech Feeds https://ift.tt/3dZz1m1

Comments