17 वर्षांपूर्वी असं सुरू झालं जी-मेल, ही आहेत नवीन फिचर्स

अकोला: इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी गुगलच्या ‘जीमेल’चा वापर केलेला असतो. अनेकांचे प्रायमरी इमेल आयडी तर ‘जीमेल’ वरच असतात. परंतु, आपल्यापैकी अनेकांना अजूनही ‘जीमेल’ची सर्व पूर्णपणे माहिती नाहीत. या फिचर्सची माहिती झाली तर आपल्याला जीमेल वापरणे अधिक सोयीचे होईल.

१ एप्रिल २००४ मध्ये पहिल्यांदा ‘गुगल‘ने जेव्हा ई-मेलच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकत असल्याचे जाहीर केले, तेव्हा हा ‘एप्रिल फूल‘चा प्रकार तर नाहीना, अशी शंकाही अनेकांच्या मनाला चाटून गेली. पण, तसे काही नव्हते. जीमेल ही सेवा त्या वेळच्या इतरांपेक्षा निराळी होतीच, शिवाय गुगलचे भक्कम सपोर्ट त्यामागे असल्यामुळे नवनवीन तंत्रे अवलंबून वापरकर्त्यांला सुखी ठेवण्याची काळजीही घेतली जाणार, एवढी खात्री मात्र अनेकांना होती. पण जीमेल वापरण्यासाठी सुरवातीच्या काळी निमंत्रण आवश्यक असे. प्रत्येक जीमेलधारकाला दोनच निमंत्रणे पाठवता येत, पुढे ती चार झाली. ब्लॉगर आदी अन्य साधनांच्या वापरकर्त्यांना जीमेल या सेवेनेच जीमेलचे हे एवढे अप्रूप अनेक कारणांसाठी होते.

दिली 36 जीबीची क्षमता
हॉटमेल वा याहू आदी सेवा फारतर २० मेगाबाइट साठवणक्षमताच देत असताना, जीमेलने थेट एक गिगाबाइट साठवणीचे भांडारच देऊ केले होते. जीमेलची ही क्षमता आता ३६ गिगाबाइटपर्यंत किंवा त्याहीपुढे आहे. खरोखरच जीमेल सेवा सुरू झाली आणि हा हा म्हणता जगभरातील लोकांना जी-मेलने आकृष्ट केले. व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंग वगैरे गोष्टी आधीही होत्या. परंतु, त्यांची ऍप्लिकेशन्स डाऊनलोड करून घ्यावी लागत. ‘जी-मेल‘मध्ये एकाच ठिकाणी सर्व सुविधा हात जोडून उभ्या राहिल्या. कॅलेंडर, ऑनलाइन ड्राइव्ह, फोटो होस्टिंग, व्हिडिओसाठी यू-ट्यूब, ब्लॉग, बातम्या आणि ‘गुगल‘च्या सर्व सेवा वापरण्याची सोय झाली. जीमेल ही सेवा इतरांपेक्षा आगळीच हवी, यासाठी तिच्या दिसण्यापासून ते तांत्रिक क्षमतांपर्यंत किती तरी गोष्टी निराळ्या आणि त्या वेळी काळापुढल्या होत्या.

पहिल्या दिवसापासून मोबाइल फोनवरही जीमेल पाहता येईल, अशी तांत्रिक व्यवस्था होती; तेव्हा त्या क्षमतेचे मोबाइलच त्या काळी जास्त नव्हतेच.

निळ्या-करड्या रंगाचे हॉटमेल, पिवळ्या-जांभळ्या रंगाचे याहू यांच्यापेक्षा अगदी स्वच्छ दिसणारी, पांढऱ्यावर गुगलच्या चार रंगांचा अगदी माफकच वापर असणारी ही विंडो, पुढल्या काळात इंटरनेटवर रंगरंगोटीपेक्षा वापरक्षमतेलाच महत्त्व येणार, अशा नव्या सौंदर्यशास्त्राची ग्वाही देणारी होती. अशी संपूर्ण रचना तयार करण्यामागे गुगल कंपनीतील अभियंता पॉल बुशैत याची धडपड होती.

सुरूवातीला नवी सेवा मोफत द्यायची किंवा नाही, यासारख्या मुद्‌द्‌यांवर आधी कंपनीत वादही झाले होते. पण, या सगळ्यातून तावून-सुलाखून तयार झालेली "जी-मेल‘ सेवा पाहतापाहता इतकी लोकप्रिय झाली, की सध्या ती वापरणाऱ्यांची संख्या १५० कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. गुगल व जीमेल सध्या ५७ भाषांत वापरता येते, त्यांपैकी निम्म्याहून अधिक भाषा आशियाई आहेत!

जीमेलच्या वापरकर्त्यांपैकी निम्मे आशियातच आहेत. जी-मेल मुळे माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर संगणकाच्या पडद्यावर उमटविलेली अक्षरे निमिषार्धात सातासमुद्रापार पोचण्याची सोय उपलब्ध झाली. या ‘डाकिया‘चे स्वरूपच आमूलाग्र पालटून गेले. मग ‘पांढऱ्यावर काळे‘ करण्याची आवश्यकता उरली नाही.

जी-मेलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जी-मेलची अनोळखी फीचर्स.
इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी गुगलच्या 'जीमेल'चा वापर केलेला असतो. अनेकांचे प्रायमरी इमेल आयडी तर 'जीमेल' वरच असतात. परंतु, आपल्यापैकी अनेकांना अजूनही 'जीमेल'ची सर्व पूर्णपणे माहिती नाहीत. या फिचर्सची माहिती झाली तर आपल्याला जीमेल वापरणे अधिक सोयीचे होईल.

इमेल फिल्टर 
इमेल फिल्टर तयार करण्यासाठी जीमेलच्या इनबॉक्समध्ये जा. त्यानंतर गो टू सेटिंग्ज-फिल्टर टॅब-क्रीएट अ न्यू फिल्टर या क्रमाने जावे लागते. फिल्टर तयार झाल्यानंतर त्यात स्कीप इनबॉक्स, अप्लाय द लेबल, डीलीट आणि इतरही अनेक पर्याय असतात. फिल्टर अॅक्टिव्हेट झाल्यानंतर तुमच्याकडे येणारे सर्व इमेल्स तुम्ही निवडलेल्या पर्यायांनी तपासल्यानंतरच इनबॉक्समध्ये येतील.

इमेल सबस्क्रिप्शनचे वर्गीकरण
वेगवेगळ्या इमेल सबस्क्रिप्शनचे इमेल फिल्टर तयार करण्यासाठी + या चिन्हाचा उपयोग करावा. The Onion या वेबसाइटवरुन इमेल सबस्क्रिप्शन घ्यायचे असेल तर tyler.durden+theonion@gmail.com हा इमेल अॅड्रेस तुम्ही देऊ शकता. त्यामुळे theonion वरून सर्व इमेल्स तुमच्या इनबॉक्समध्ये येतील आणि आवश्यकता नसल्यास फिल्टर बसवून ते परस्पर डीलीट करता येतील.

कॉन्टॅक्ट्स
आपल्या स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट्स ऑटोमॅटीकली आपल्या गुगल अकाऊंटशी जोडले जातात. यासाठी तुम्ही ज्या इमेल अॅड्रेसने स्मार्टफोनवर साइन इन केलेले असते त्यातील कॉन्टॅक्ट्स अपडेट केलेल असायला हवेत.

गुगलशी कॉन्टॅक्ट्स जोडणे
अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनवरून सेटींग्ज-अॅड अकाऊंट-गुगल या क्रमाने सर्व टप्पे पूर्ण केले की गुगल अकाऊंटशी कॉन्टॅक्ट्स जोडता येतात. अशा पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनमध्ये जे फोन नंबर्स असतील ते सर्व गुगल अकाऊंटशी जोडले जातात आणि नंबर डीलीट होण्याचा धोका कमी होतो. गुगल आयडीवर नंबर सेव्ह झाला की तो तुमच्या जीमेल अॅड्रेस बुकमध्ये समाविष्ट होतो आणि तुम्ही त्या इमेल अॅड्रेस ज्या डीव्हाइसवरून उपयोग कराल त्यात तो दिसू शकतो. अॅण्ड्रॉइडशिवाय आयओएस, विन्डोज फोन आणि ब्लॅकबेरीवरूनसुद्धा कॉन्टॅक्ट्स गुगल अकाऊंटशी जोडता येतात.

गुगल १८....
गुगलच्या मुख्य पानावरील डाव्या कोपऱ्यातील जीमेल-कॉन्टॅक्ट्स-मोअर-फाइंड अॅण्ड मर्ज कॉन्टॅक्ट्स या क्रमाने पुढे गेले की आपल्या अॅड्रेस बुकमधील कॉन्टॅक्ट्सच्या डबल एन्ट्रीज दिसून येतात. यातील आवश्यक त्या कॉन्टॅक्ट्सला क्लीक करा आणि मर्ज करा.

कॅलेंडर....
तुमच्या गुगल अकाऊंटवर स्वतःचे कॅलेंडर/प्लानर तयार करता येते. हे कॅलेंडर इमेलद्वारे इतरांना पाठवता येऊ शकते. त्यामुळे तुमचे त्यामुळे तुमच्या वेळापत्रकानुसार इतरांना त्यांची कामे प्लान करता येतात. लॅब्ज ऑप्शनमधून कॅलेंडर सेट अप करता येते.



from Sci-tech Feeds https://ift.tt/3ucyuSt

Comments