Appleने तबल्याचे संगीत वापरलेली iPhone12 ची ही जाहिरात, सोशल मिडीयावर होतेय व्हायरल

स्मार्टफोनच्या दुनयेतील जगप्रसिध्द कंपनी Apple ने त्यांचा स्मार्टफोन  iPhone 12 हा प्रमोट करण्यासाठी नुकतीच एक नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीची विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये भारतीय तबल्याचे बीट्स वापरले असून ही जाहिरात खास भारतीय वापरकर्त्यांना लक्षात ठेवून तयार केली गेली आहे. यात असलेल्या तबल्याच्या संगीतामुळे  आतापर्यंत लाखो लोकांनी ही जाहिरात पाहिली आहे. तसेच ही सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. 

तबला बीट्सचा वापर 

Apple  “फंबल” नावाची 38 सेकंदाची व्हिज्युअल जाहिरात प्रसिद्ध केली आहे, यामध्ये एक महिला iPhone वर बोलत असते आणि मध्येत आयफोन तीच्या हातातून निसटतो. तो फोन रस्त्यावर पडण्यापासून वाचवण्यासाठी महिला जे प्रयत्न करते  त्याला बॅकग्राउंड म्यूजीक म्हणून ब्रिटीश-भारतीय संगीतकार नितीन सहनी यांचे 'द कॉन्फरन्स' या गाण्यातील तबला बीट्स वाजत आहेत.

सोशल मिडीयावर जोरदार चर्चा

यूट्यूबवर देण्यात आलेल्या डिस्क्रिप्शन मघ्ये जाहिरातीचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, "Ceramic Shield सोबत  iPhone 12 काच अगदी मजबूत आहे. निश्चिंत राहा" हा व्हिडीओ युट्यूबर तब्बल 4.3 लाखांहून अधिक वेळा पाहीला गेला आहे, इतर सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर देखील शेअर केला जात आहे. 

संगीतकाराचेही ट्विट 

म्यूजिशियन और सॉन्ग कंपोजर नितिन साहनी यांनी ही जाहिरात ट्वीट केली आहे. त्यांनी लिहिले होय त्यानी आयफोन १२ च्या जहिरातीसाठी माझे गीत 'conference' वापरले आहे. मी कधी याचा विचार देखील केला नव्हता.
 



from Sci-tech Feeds https://ift.tt/3cE6uBn

Comments