इन्स्टाग्रामवर आपल्या पोस्ट ट्रेंडिंगमध्ये आणणे आहे सोपे, वापरा या टिप्स

प्रत्येकाला इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध व्हायचं आहे. यावर केलेल्या पोस्ट्स ट्रेंड व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा  असते. जगभरात इन्स्टाग्रामचे लाखो वापरकर्ते आहेत, आणि प्रत्येकजण फॉलोअर्स वाढवण्यासाठी धडपड करताना दिसतो त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरताना लोक दिसतात. परंतु बहुतेक लोकांना हे माहित नाही की इन्स्टाग्रामवर पोस्ट ट्रेंड करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. आज आपण इंस्टाग्राम पोस्टची पोहत वाढवण्यासाठीच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत. 

पोस्टमध्ये योग्य हॅशटॅग वापरा

आपण आपल्या पोस्टमध्ये चांगले आणि अचूक हॅशटॅग वापरत असल्यास तुम्ही केलेल्या पोस्टची पोहच लक्षणीय वाढेल. या प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग खूपच महत्त्वाचे आहेत. इन्स्टाग्रामवर दररोज नवीन हॅशटॅगचा ट्रेंड येतो आणि कोट्यावधी लोक त्यांच्याबद्दल पोस्ट करतात. अशा परिस्थितीत इंस्टावर कोणताही फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करण्यापूर्वी ट्रेंडिंग हॅशटॅगबद्दल निश्चितपणे माहिती घ्या. यामुळे आपली पोहोच वाढेल आणि फॉलोअर्स देखील वाढण्याची शक्यता आहे.

चालू घडमोडी संबंधित पोस्ट करा

जर आपण इन्स्टाग्रामवर सध्या सुरू असलेल्या घटनांविषयी पोस्ट केले तर त्याची पोहोच अधिक मिळेल. जास्तीत जास्तीत- जास्त लोकांना तो विषय आवडत असेल तर ते तुमची पोस्ट लाईक आणि शेअर देखील करतील. हे आपले फॉलोअर्श वाढण्याची शक्यता वाढवते. आपण ज्वलंत समस्यांशी संबंधित पोस्ट केल्यास लोकांना आपली पोस्ट आवडेल.

पोस्टिंगची वेळ जाणून घ्या 

इन्स्टाग्राम आपल्याला अशी काही फिटर्स देते ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणती पोस्ट सर्वात जास्त लाईक केली गेली हे आपल्याला समजू शकेल. इन्स्टाग्रामवर सक्रिय वापरकर्त्यांची संख्या किती आहे हे आपण इंटरनेटवर देखील शोधू शकता. जेव्हा आपल्याला हे कळते की बहुतेक वापरकर्ते विशिष्ट वेळी इंस्टावर सक्रिय असतात, तेव्हा आपण त्याच वेळी पोस्ट अपलोड केले पाहिजे. हे आपल्या पोस्टवरील अधिकाधिक लोकांना गुंतवून ठेवेल.

इतर वापरकर्त्यांना टॅग करा

आपण पोस्टसह आपला फोटो किंवा व्हिडिओ शूट करत आहात त्या ठिकाणी टॅग करायला विसरु नका. हे आपल्या पोस्टची पोहोच वाढवेल आणि त्या ठिकाणच्या नावाचा शोध घेतल्यानंतर आपली पोस्टही सगळ्यांना दिसेल. तसेच, जर तुम्ही तुमची पोस्ट अनेक सेलिब्रिटींना किंवा प्रसिद्ध व्यक्तींना टॅग केली तर तुमच्या पोस्टची पोहोच वाढेल. जर त्या सेलिब्रिटीला आपली पोस्ट आवडली आणि त्यांनी लाइक किंवा शेअर केली तर आपली पोस्ट त्वरित ट्रेंडिंग होईल.
 



from Sci-tech Feeds https://ift.tt/3fqqw3R

Comments