आजपासून स्मार्टफोनसाठी मोजावे लागतील जास्त पैसे, अ‍ॅक्सेसरीजही महागणार

या चालू महिन्यापासून वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढणार आहेत. एप्रिल महिन्यात वाहनांपासून ते मोबाईलपर्यंतच्या किंमती वाढू शकतात. स्मार्टफोन सोबतच त्याच्या अ‍ॅक्सेसरीजची किंमतमध्ये देखील वाढ होऊ शकते. यावर्षीच्या केंद्रिय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी याविषयी घोषणा केली होती. आज आपण या महिन्यापासून मोबाइल फोन आणि अ‍ॅक्सेसरीजच्या किंमतीत किती वाढ होणार आहे ते जाणून घेणार आहोत.

आयात शुल्क वाढेल

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवरील २.५ % आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली होती. ज्यामध्ये मोबाइल चार्जर, मोबाइल पोर्ट, अ‍ॅडॉप्टर, बॅटरी आणि हेडफोन्स सारख्या उपकरनांचा  समावेश आहे. मागच्या महिन्यात आयत शुल्क ७.५टक्के होते परंतु १ एप्रिलपासून ते वाढवून १० टक्के केले जाईल. आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर स्मार्टफोनशिवाय इतर गॅझेटसाठी देखील आपल्याला अधिक पैसे द्यावे लागतील

मोबाइल महाग होईल

एक एप्रिलपासून आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर याचा प्रीमियम स्मार्टफोनवर सर्वाधिक परिणाम होईल. स्वस्त आणि बजेट रेंज मोबाईलची किंमत जास्त वाढणार नाही. अधीपासूनच स्वस्त असणाऱ्या स्मार्टफोनच्या किमतींमध्ये जास्त फरक पडणार नाही. मात्र कोरोना काळात हे मोबाइल कंपन्यांसाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे.



from Sci-tech Feeds https://ift.tt/3m7Nqyx

Comments