नागपूर : सर्च इंजिन गूगलने सन २०२० चा Annual Report 'Year In Search' हा वार्षिक अहवाल जारी केला आहे. अहवालात असे नमूद केले गेले आहे की गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान आणि त्यानंतर भारतात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन कोर्सेस याबद्दल सर्वाधिक यूजर्सनी सर्च केले. तसेच इतरही अनेक महत्वाच्या गोष्टी आत सर्च करण्यात आल्या. चला तर मग जाणून घेऊया आणखी काही Year In Search.
सर्चमध्ये इतकी झाली वाढ
गुगलच्या अहवालानुसार सन २०२० मध्ये वर्क फ्रॉम होमच्या शोधात २०१९ च्या तुलनेत १४० टक्के वाढ दिसून आली. त्याचबरोबर ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या शोधात ८५ टक्के वाढ दिसून आली. या व्यतिरिक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या (Certification Course) शोधात ५० टक्के वाढ झाली आहे. इतकेच नाही तर ऑनलाइन वस्तू कशा विकायच्या, या शोधात ६५ टक्के वाढ दिसून आली.
या राज्यांत सर्वाधिक वर्क फ्रॉम होम सर्च
वर्क फ्रॉम होम शोधणार्या राज्यांमध्ये तेलंगणा आघाडीवर आहे. त्यानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुडुचेरी आणि महाराष्ट्रात याचा सर्वाधिक शोध घेण्यात आला.
ही शहरे सर्चमध्ये अग्रेसर
महाराष्ट्रातील मीरा भाईंदर शहरात वर्क फ्रॉम सर्वाधिक शोधले गेले. त्याशिवाय सिकंदराबाद, ठाणे, हैदराबाद, पिंपरी चिंचवड, गाझियाबाद, बेंगलुरू, नवी मुंबई, विशाखापट्टणम आणि म्हैसूर या ठिकाणी वर्क फ्रॉम होमचा सर्वाधिक शोध घेण्यात आला.
लॉकडाऊनचा परिणाम
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा धोका रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आला. . ज्यामुळे लाखो लोकांनी घरून काम केले. या लॉकडाऊनमुळे हजारो लोक बेरोजगार झाले. यामुळे वर्क फ्रॉम सर्चमध्ये मोठी वाढ झाली.
संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ
from Sci-tech Feeds https://ift.tt/3wdS1DT
Comments
Post a Comment