एकच नंबर! बाजारात आली स्मार्टफोनसह लॅपटॉपलाही चार्ज करणारी पॉवर बँक; mAh क्षमता बघून व्हाल थक्क 

नागपूर : स्मार्टफोनचा जास्त वापर होत असल्याने पॉवर बँकची मागणीही आजकाल वाढायला लागली आहे. बाजारात बरेच पॉवर बँकचे पर्याय उपलब्ध आहेत, परंतु जेव्हा लॅपटॉपसाठी पॉवर बँक घेण्याबाबत चर्चा केली जाते, तेव्हा असा विशेष पर्याय नसतो. परंतु आम्ही तुम्हाला अशा पॉवर बँकेबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या लॅपटॉपलासुद्धा चार्ज करेल. तसेच, प्रवासात आपल्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल. चला तर मग जाणून घेऊया. 

मोबिलिटी प्रॉडक्ट्स निर्माता EVM ने आपली Enlappower पॉवरबँक बाजारात आणली आहे. या पॉवर बँकची क्षमता 20000 mAh आहे. ही सी पोर्टच्या आधारे लॅपटॉप चार्ज करू शकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात सी प्रकारचे कनेक्टर आहेत. याशिवाय 4 फूट लांब वायरदेखील या सोबत उपलब्ध आहे. ही पॉवर बँक बॉडी मेटलची आहे. एन्लापॉवर पॉवरबँकची किंमत 9,999 रुपये आहे आणि त्याला तीन वर्षाची वॉरंटी मिळत आहे.

WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर

लॅपटॉपसाठी ठरेल उपयुक्त

ही पॉवरबँक मॅकबुक, आयपॅड, डेल, एचपी, लेनोवो, एलजी ग्राम, आसुस झेनबुक आणि सर्व स्मार्टफोन चार्ज करण्यास सक्षम असेल. लॅपटॉप बॅटरी बर्‍याचदा जास्त बॅकअप देत नाहीत, म्हणून हे डिव्हाइस बर्‍यापैकी उपयुक्त ठरू शकते.

खुशखबर! आता iPhone यूजर्सही खेळू शकणार FAUG गेम; लवकरच...

Realme आणि Redmi ला देणार टक्कर

जरी विशिष्ट लॅपटॉप चार्ज करणारी पॉवरबँक या पॉवरबँकशी स्पर्धा करण्यासाठी दिसत नाही, परंतु जर फक्त स्मार्टफोनसाठी ओव्हर बँक म्हंटलं तर ती Realme आणि Redmi सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करेल. या दोन्ही कंपन्यांकडे 20000 mAh बॅटरीसह पॉवरबँक्स आहेत, परंतु सध्या लॅपटॉप चार्जिंग डिव्हाइस अस्तित्वात नाही.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 



from Sci-tech Feeds https://ift.tt/3sEJBD9

Comments