WhatsApp मध्ये या वर्षी येतायत आणखी दमदार फिचर्स, जाणून घ्या सविस्तर

नाशिक : व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वत्र सर्रास वापरण्यात येणारे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म असून मॅसेज पाठवण्यासाठी हे लाखो लोक वापरतात, व्हॉट्सअ‍ॅप न वापरणारी व्यक्ती शोधून सापडणार नाही. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅप मध्ये सतत काही ना काही बदल होत असतात आशाच काही नव्या फिचर्सची भर पडणार आहे. जेणे करुन व्हॉट्सअ‍ॅप  वापरणे आणखी सोपे आणि मजेशीर होणार आहे. 

या वर्षाच्या सुरूवातीपासूनच व्हॉट्सअ‍ॅपने काही नवे फिचर्स लॉन्च केले आहेत, तर या वर्षाच्या अखेरीस आणखी कीही नवे फिचर येणार आहेत. यावर्षी कंपनी 6 प्रमुख फिचर देण्याच्या तयारीत असून यामध्ये  मल्टी-डिव्हाइस सपोर्ट, व्हॉट्सअ‍ॅप लॉगआउट, इंस्टाग्राम रील्स, ऑडिओ मेसेज स्पीड आणि रिड लेटर सारख्या फिचर्सचा समावेश असणार आहे. आज आपण व्हॉट्सअ‍ॅप च्या या नव्या फिचर्सबद्दल जाणून घेणार आहोत.

1. WhatsApp Multi-Device Support- व्हॉट्सअ‍ॅप मल्टी-डिव्हाइस सपोर्ट या फिचरची बर्‍याच दिवसांपासून वाट पाहिली जात आहे. आतापर्यंत एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट दोनपेक्षा जास्त डिव्हाइसवर वापरता येत नाही. एक, आपण आपल्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चालवू शकता आणि दुसरे ते वेब व्हर्जनवर चालवू शकता. मात्र आता ही कमतरतात पुर्ण करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप मल्टी-डिव्हाइस सपोर्ट हे फिचर येत आहे.

2. WhatsApp Logout-  व्हॉट्सअ‍ॅप लॉगआऊट व्हॉट्सअ‍ॅपचे हे वैशिष्ट्य डिलीट अकाउंटची जागा घेईल. आतापर्यंत आपल्याला एका फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप खात्यात दुसर्‍या फोनवर लॉग इन करायचे असल्यास आपणास मागील खाते डिलीट करावे लगत असे किंवा व्हॉट्सअ‍ॅप हे अॅप  अनइंस्टॉल करावे लागत होते. परंतु लॉगआउट या फिचरमुळे याची गरज उरणार नाही. लॉगआउट पर्याय मल्टी-डिव्हाइस सपोर्टसाठी उपयोगी ठरेल.

3. WhatsApp Instagram Reels  लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर इन्स्टाग्राम रील देखील येणार आहेत, यासाठी स्वतंत्र सेक्शन तयार केला जाईल. व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी फेसबुकने हा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम रील्स हे एक लहान व्हिडिओ फॉरमॅट आहे, जे टिकटॉकला रिप्लेस करण्याचा प्रयत्न करीत आहे.

4. WhatsApp audio message speed - लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन फिचर दिसेल जे व्हॉईस मॅसेजची गती नियंत्रित करेल. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्याने पाठविलेले संदेश ऐकता तेव्हा आपल्याला त्याचा वेग नियंत्रित करण्याचा पर्याय मिळेल, ज्यामुळे आपला वेळ वाचेल. हा वेग 1x सारख्या पर्यायासोबत देण्यात येईल. यात 1.5x किंवा 2x गती करण्याचे पर्याय देखील असतील. 

5. WhatsApp Read later -   ‘Read later’  हे फिचर आर्काइव्ह चॅटमध्ये आणखी सुधारणा करेल.  जेव्हा कोणी चॅट रिड लेटर मध्ये टाकेल तेव्हा व्हॉट्सअॅप त्याविषयी कोणतीही नोटीफिकेशन देणार नाही. या फिचरमध्ये व्हॅकेशन मोड देखील देण्यात येईल.

6. Join missed group calls- व्हॉट्सअ‍ॅपवर बर्‍याच वेळा ग्रुप कॉल मिस होतात, परंतु कंपनी एक नवीन फीचर तयार करत आहे, ज्याच्या मदतीने आपण ग्रुप कॉलमधून डिस्कनेक्ट झाल्यानंतर पुन्हा जॉइन होऊ शकता. हे वापरकर्त्यांचा वेळ वाचवेल आणि त्यांच्या सोयीनुसार ते कधीही ग्रुप कॉल  सोडू शकतात आणि त्याच्यात पुन्हा सामील होऊ शकतात. 
 



from Sci-tech Feeds https://ift.tt/2QHwO4Q

Comments