सॅमसंगने भारतीयांसाठी आणली स्मार्ट वॉशिंग मशिन; आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर 

अहमदनगर ः नवे तंत्रज्ञान माणसाला सुखी बनवत आहे. पूर्वी बापाच्या हातातील काम मुलगा घ्यायचा. त्यामुळे मुलगा जोपर्यंत हाताखाली येत नाही, तोपर्यंत बापाच्या जीवाला घोर लागायचा. आता तंत्रज्ञानामुळे मशिन आपल्या हातातील काम घेत आहेत. आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञान तर अजबच आहे.

सॅमसंगने भारतात घरगुती उपकरणांबाबत तो प्रयोग केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) चालणारे सक्षम वॉशिंग मशीन बाजारात आणलंय. हे पूर्ण स्वयंचलित फ्रंट लोडिंग वॉशिंग मशीन आहे. भारतीयांसाठीच ते  डिझाइन केलेय. 

Google पे अ‍ॅप वापरुन असा करा FASTag रीचार्ज 

सॅमसंगच्या डिजिटल इंडिया सशक्तीकरणाच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे. यामध्ये सॅमसंगचे विशेष तंत्रज्ञान इकोबॅबल आणि क्विक ड्राईव्ह तंत्रज्ञान आहे, जे कपड्यांची अधिक काळजी घेण्यास तसेच वेळ आणि वीज वाचविण्यात मदत करते.

धुण्याचे आणि स्वच्छतेचे उच्च प्रमाण सुनिश्चित करण्यासाठी, सर्व नवीन मॉडेलमध्ये हायजीन स्टीम तंत्रज्ञान समाविष्ट केले आहे. जे कपड्यांमध्ये अडकलेले धूळ कण काढून टाकण्यास आणि बॅक्टेरिया आणि अॅलर्जीमुळे उद्भवणार्या जंतूंचा 99.9 टक्के भाग काढून टाकण्यास सक्षम आहे.

सिंगल चार्जमध्ये 50 किलोमीटर धावणारी Niu ची इलेक्ट्रिक किक स्कूटर लॉन्च!

ते मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. हे मशिन आपण कसे धुतो. ते लक्षात ठेवतो आणि सर्वात सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या वॉशिंगची शिफारस करतो. ही आयओटी सक्षम या वॉशिंग मशीन लाइन-अप या स्मार्ट इंटरनेट ऑफ गैलेक्सी स्मार्टफोन, सॅमसंग स्मार्ट टीव्ही आणि फॅमिली हब रेफ्रिजरेटर तसेच अलेक्सा आणि गूगल होमसारख्या उपकरणाद्वारे आपल्याला जोडता येईल. त्यामुळे ग्राहकाला ती वापरणे सोपे जाईल. 



from Sci-tech Feeds https://ift.tt/3sbtjRp

Comments